नवी दिल्ली, २९ डिसेंबर २०२२: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे सोमवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
- यापूर्वी २०२० मध्ये बिघडली होती तब्येत
याआधीही सीतारमण यांची तब्येत बिघडली होती. २०२० मध्ये त्यांनी सर्वाधिक वेळ अर्थसंकल्पीय भाषण देऊन विक्रम केला होता. त्यावेळी त्यांनी १६० मिनिटे भाषण केले होते. हे भाषण संपताना त्यांची तब्येत बिघडली होती. त्यावेळी त्यांना बोलण्यात अडचण येत होती.
दरम्यान, ६३ वर्षीय निर्मला सीतारमण या केंद्रीय अर्थमंत्री असून, पुढील वर्षी २०२३ मध्ये अर्थसंकल्प सादर करतील.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.