आर्या फौंडेशनच्या वतीने शहिद काळे कुटुंबास आर्थिक मदत

सोलापूर, दि. १४ जुलै २०२०: देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती दिलेले वीरजवान पानगावचे सुपुत्र स्व.सुनील काळे यांच्या कुटुंबास आर्या फाउंडेशन च्यावतीने आर्थिक मदत देण्यात आली. २०१४ साली या संस्थेची स्थापना झाली आहे.

आर्या फाऊंडेशन जळगाव येथील सामाजिक संस्था आहे आत पर्यंत शाहिद जवानाच्या कुटुंबाला १० लाख रुपये मदत देऊन आपली देश सेवा अविरत सुरु ठेवत सामाजिक देणे या भावनेतून स्व. काळे कुटुंबाच्या दुःखात सहभाग नोंदवला आहे.

शहीद सुनील काळे यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी जळगाव आयएमए संघटनेचे सचिव व आर्या फाउंडेशन संस्थापक डॉ.पाटील यांनी ६५ हजार रुपयाचा धनादेश पाठवला. कोरोना महामारीमुळे डॉ पाटील यांना प्रवास करता येत नसल्याने आय.एम.ए. गर्भलिंग निदान कमिटीचे अध्यक्ष डॉ.संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील पानगावचे सुपुत्र शहीद वीरजवान स्व. सुनील काळे यांच्या वीरपत्नी अर्चना काळे यांना देण्यात आला. त्यानुसार आपल कर्तव्य या भावनेतून शाहिद काळे कुटुंबास आर्थिक मदत करून सांत्वन केल आहे.

१२ लाख रुपये कॅनसर रुग्णांना मदती स्वरूपात दिला त्याचबरोबर कोरोना महामारीच्या काळात शासकीय रुग्णालयत पी.पी.ई. किट समाजातील गरजू कुटुंबना अन्न धान्य वाटप करण्यात आले. यावेळी कुर्डुवाडी आय.एम.ए. सचिव डॉ. सचिन माढेकर, डॉ. रोहित दास,श्रद्धा आपटिकलंचे बालाजी शिंदे तसेच काळे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा