1 April New Rule in New financial year: आज पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतंय. या नवीन आर्थिक वर्षात पैशासंबधित अनेक नियमात बदल होणार आहेत. यामध्ये एटीएममधून पैसे कडण्यापासून ते यूपीआय अशा सर्व नियमांचा यामध्ये समावेश असणार आहे.त्यामुळे याचा परिणाम थेट तुमच्या बजेटवर होणार आहे. काय आहेत हे नवीन नियम चला तर मग जाणून घेऊ बातमीतून.
असे असतील नवीन नियम :
१ ) बचत खाते
आता तुम्हाला तुमच्या बचत खात्यात कमीत कमी रक्कम ठेवावी लागणार आहे, जर तुम्ही बॅलेन्स ठेवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. शहरी आणि ग्रामीण बँकेची कमीत कमी ठेवी ठेवण्याची रक्कम वेगवेगळी असणार आहे.


२) यूपीआय खाते बंद होणार
यूपीआयच्या नियमात बदल करण्यात आला असून यामध्ये जे मोबाईल नंबर यूपीआय खात्याशी जोडला गेला आहे. परंतु, खूप दिवसांपासून जर तो नंबर बंद असेल त्यांना बँकेच्या रेकॉर्डमधून काढून टाकण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही जास्त दिवसांसाठी
यूपीआय वापरले नाही तर तुमची सेवा बंद केली जाणार आहे.


३) टॅक्सच्या नियमांत बदल :
नवीन आर्थिक वर्षात टॅक्सच्या नियमांत सुद्धा बदल करण्यात आले आहेत. यामध्ये तुम्हाला आता वेगवेगळ्या उतपणा साठी टॅक्स भरावा लागणार आहे.


४) ATM मधून पैसे काढताना मोजावे लागणार पैसे :
एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा कमी करण्यात आली असून आता तुम्हाला महियातून फक्त ३ वेळाच पैसे काढता येणार आहे. जर ३ पेक्षा जास्त वेळा तुम्हाला पैसे काढावयाचे झाल्यास प्रत्येक ट्रांजेक्शनसाठी तुम्हाला २० ते २५ रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.


५) डिजिटल बँकिंग मध्ये AI चा वापर :
लवकरच डिजिटल बँकिंगमध्ये AI चा वापर केला जाणार आहे. आता AI बँकिंग असिस्टंटमुळे ग्राहकाना सल्ले दिले जाणार असून त्यासाठी AI पावर्ड चॅटबॉक्स लॉंच केले जाणार आहे.


न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर