नांदेड जिल्ह्यातील १६ हजार ऑटो चालकांवर आर्थिक संकट

नांदेड, दि.१८ मे २०२० : लाॅकडाऊनमुळे नांदेडसह राज्यातील ऑटो रिक्षा चालकांचा व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास १६ हजार ऑटो चालकांसह त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढवले आहे. तरी रिक्षा चालकांना सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी टायगर ऑटो रिक्षा संघटनेचे अहमद बागवाले यांनी केली आहे.

लाॅकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच वाहतूक व्यवस्था ठप्प आहे. राज्यात आज घडीला १५ लाख तर नांदेड जिल्ह्यात जवळपास १६ हजार परवानाधारक ऑटो रिक्षा चालकांची संख्या आहे.

मागील अनेक दिवसांपासून ऑटो चालकांचा व्यवसाय बंद असल्याने त्यांना कुटुंबियांचा उदरनिर्वाह भागविणे अवघड बनले आहे. अशा बिकट परिस्थितीत शासनाकडून ऑटो चालकांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे बनले आहे.

लाॅकडाऊनमुळे जिल्ह्यातील १६ हजार ऑटो रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे दिल्ली सरकारप्रमाणे राज्यातील ऑटो चालकांना दरमहा पाच हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी टायगर ऑटो रिक्षा संघटनेचे अहमद बागवाले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा