नवी दिल्ली, २ मार्च २०२१: देशात गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळाले आहे. देशातील काही शहरांमध्ये तर पेट्रोल आणि डिझेलचे भाव शंभरच्या पुढे गेले आहे. ढासळलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि आता त्यात पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे महागाईचा फटका यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, अलीकडच्या दोन-तीन दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर असल्याचे दिसून आले आहे. आज देखील इंधनाच्या किमती मध्ये कोणतीही वाढ झाली नाही.
आजचे दर सोमवारच्या दरा इतकेच आहे. दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत २४ पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किमतीत १५ पैशांची वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. मुंबईमध्ये देखील इंधनाचे दर स्थिर असून याआधी दरात १३ पैशांची वाढ झाली होती आणि आता पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ९७.५७ रुपये आहे. तर डिझेल ८८.६० दराने विकले जात आहे.
इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, मंगळवारी कोलकातामध्ये पेट्रोलचा दर ९१.३५ लिटर आहे. त्याचबरोबर डिझेल आज प्रति लिटर ८४.३५ रुपयांवर आहे. चेन्नईत पेट्रोलच्या दरात २२ पैशांची वाढ झाली होती आणि आता पेट्रोल ९३.११ रुपये प्रति लिटरला विकले जात आहे.
राज्यातील पेट्रोलचे दर
मुंबई – ९७.४७ प्रतिलिटर
ठाणे – ९७.४५ प्रतिलिटर
पुणे – ९७.३५ प्रतिलिटर
नागपूर – ९८.०८ प्रतिलिटर
सांगली – ९७.७३. 73 प्रतिलिटर
सातारा – ९७.९४ प्रतिलिटर
कोल्हापूर – ९७.७८ प्रतिलिटर
परभणी – ९९.६८ प्रतिलिटर
राज्यातील डिझलचे दर
मुंबई – ८८.६० प्रतिलिटर
ठाणे – ८८.५५ प्रतिलिटर
पुणे – ८७.०३ प्रतिलिटर
नागपूर – ८९.१५ प्रतिलिटर
सांगली – ८७.४२ प्रतिलिटर
सातारा – ८७.६३ प्रतिलिटर
कोल्हापूर – ८७.६८ प्रतिलिटर
परभणी – ८९.२८ प्रतिलिटर
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे