IPL 2025 Shedual: नुकताच चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा हंगाम थरार संपला असून येत्या २२ मार्च पासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १८ व्या आवृत्तीला सुरुवात होणार आहे आणि ही आवृत्ती दिनांक २५ मे २०२५ पर्यंत चालेल. या १८ व्या हंगामात एकूण १० संघांचा सहभाग असेल, ज्यात मुंबई इंडियन्स,कोलकता नाईट राइडर्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांचा समावेश आहे.२२ मार्च रोजी आयपीएलच्या हंगामाला सुरुवात होणार असून कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर केकेआर आणि आरसीबी यांच्यात पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. भारतात १३ ठिकाणी एकूण ७४ सामने खेळवले जातील.
आयपीएल २०२५ चे वेळापत्रक :




भारतात १३ ठिकाणी होणार सामने :
अहमदाबाद: नरेंद्र मोदी स्टेडियम
बेंगळुरू: एम चिन्नास्वामी स्टेडियम
चेन्नई: एमए चिदंबरम स्टेडियम
दिल्ली: अरुण जेटली स्टेडियम
धर्मशाळा: हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
गुवाहाटी: बारसापारा स्टेडियम
हैदराबाद: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम
जयपूर: सवाई मानसिंग स्टेडियम
कोलकाता: ईडन गार्डन्स
लखनौ: बीआरएसएबीव्ही एकाना स्टेडियम
मुल्लानपूर: महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
मुंबई: वानखेडे स्टेडियम
विशाखापट्टणम: डॉ वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए स्टेडियम
क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर: २० मे रोजी हैदराबाद येथे होणार आहे.
क्वालिफायर २: २३ मे रोजी ईडन गार्डन्स येथे होणार आहे.
आयपीएल अंतिम सामना : २५ मे रोजी ईडन गार्डन्सवर होणार आहे.
आयपीएल २०२५ लाईव्ह येथे पाहायला मिळणार :
लाईव्ह प्रक्षेपण : आयपीएल २०२५ चे थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार
स्ट्रीमिंग प्रक्षेपण : आयपीएल २०२५ साठी जिओहॉटस्टार हा एक खास स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर