आरएसएसचे माजी सरसंघचालक एमएस गोळवलकर यांच्या पोस्टरच्या मुद्दयावरून दिग्विजय सिंह यांच्यावर एफआयआर दाखल

पुणे, ९ जुलै २०२३: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) माजी सरसंघचालक एमएस गोळवलकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्टर शेअर करून द्वेष पसरवल्याबद्दल इंदूरमध्ये काँग्रेसचे राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली.

तुकोगंज पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, स्थानिक वकील आणि युनियनचे कार्यकर्ते राजेश जोशी यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ – ए (धर्माच्या आधारावर दोन गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे), ४६९ (प्रतिष्ठेला हानी पोहोचवणे) ही कलमे लावण्यात आली. सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम ५०० (मानहानी) आणि कलम ५०५ (सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने प्रक्षोभक सामग्रीचा प्रसार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जोशी यांनी त्यांच्या तक्रारीत आरोप केला आहे की, सिंग यांनी दलित, मागासवर्गीय, मुस्लिम आणि हिंदूंमध्ये वैमनस्य निर्माण करून वर्ग संघर्ष भडकवण्यासाठी, गोळवलकर यांचे नाव आणि छायाचित्र असलेले वादग्रस्त पोस्टर फेसबुकवर शेअर केले होते. गोळवलकरांबद्दल सिंग यांच्या फेसबुक पोस्टमुळे संघ कार्यकर्त्यांच्या आणि संपूर्ण हिंदू समुदायाच्या धार्मिक श्रद्धा दुखावल्या गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मीडियाला पाठवलेल्या निवेदनात, संघाच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने आरोप केला आहे की सिंग यांनी संघटनेची प्रतिमा खराब करण्यासाठी सोशल मीडियावर, गोळवलकरांबद्दल खोट्या आणि गैरवाजवी पोस्ट केल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा