तीन दलित बहिणींवर ॲसिड हल्ल्या प्रकरणी एफआयआर दाखल

4

गोंडा, १४ ऑक्टोंबर २०२०: यूपीच्या गोंड्यामध्ये तीन दलित बहिणींवर अ‍ॅसिड फेकल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे. तिन्ही बहिणी घरी झोपल्या असताना रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. तिन्ही मुली अल्पवयीन आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी तक्रार मिळाल्याबद्दल पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३२६ ए अन्वये एफआयआर नोंदविला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.

ही घटना गोंडाच्या परसपूर पोलिस स्टेशन भागातील आहे. जेथे परसपुरात राहणाऱ्या दलित कुटुंबातील मुलींवर हा अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला. गोंडाचे पोलिस अधीक्षक (एसपी) शैलेश कुमार पांडे यांनी सांगितले की तीन मुलींवर ॲसिड हल्ला करण्यात आला आहे. केमिकलचा तपास केला जात आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमही बोलविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिन्ही बहिणींवर एसिड सारखे रसायन फेकले गेले आहे. दोन बहिणी मध्यम जखमी आहेत. तर एका बहिणीच्या चेहऱ्यावर ॲसिड पडलं आहे. त्यामुळे तिचा चेहरा गंभीरपणे भाजला आहे. तथापि, ॲसिड फेकण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

पीडित मुलींच्या आईने सांगितले की, त्यांना या घटनेविषयी कोणतीही माहिती नव्हती. हा ऍसिड हल्ला झाल्यानंतर तिघी बहिणी पैकी एक खाली पळत आली व आपल्या वडिलांना बिलगली. तेव्हा लक्षात आलं की काहीतरी झाला आहे. नंतर लक्षात आलं की तिन्ही बहिणींवर हल्ला करण्यात आला आहे. सध्या कुटुंबीयांनी कोणावर हि संशय घेतलं नाही. तसेच हा हल्ला कोणत्या कारणास्तव केला गेला हे देखील समजलं नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा