गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला आग; अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल..!

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला आग; अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल..!

मांजरी, २१ जानेवारी २०२१: पुण्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला भीषण आग लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील मांजरा परिसरात सीरम इन्स्टिट्यूटची नवीन इमारत आहे.

कोव्हिशील्ड या कोरोना विषाणूवरील लशीची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात येते. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

 

अग्निशामक दलाच्या प्रयत्नामुळे लस निर्मितीचा प्रयोग सुरू असलेला भाग वाचवण्यात यश आले असून आग पूर्ण विझल्यानंतरच किती हानी झाली, कोणत्या औषधांचा साठा धोक्यात असेल याचा अंदाज बांधता येईल असे सांगण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version