गोल पोस्ट इतर पुुणे महामार्ग पोलीस ठाण्याच्या वतीने महामार्ग सुरक्षा प्रबोधन चित्ररथाचे उद्घाटन

पुुणे महामार्ग पोलीस ठाण्याच्या वतीने महामार्ग सुरक्षा प्रबोधन चित्ररथाचे उद्घाटन

थेऊर, २१ जानेवारी २०२१: रथाच्या माध्यमातून चालकांचे प्रबोधन केले जाणार आहे. व राज्यात १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी हा कार्यकाल ३२ वा रस्ता सुरक्षा अभियान म्हणून साजरा करण्यात येत आहे. या काळात रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिक व चालकात जनजागृती करणे, हेल्मेटचा वापर, सीट बेल्ट वापरणे, ड्रंक अँड ड्राईव्हला प्रतिबंध, चुकीच्या मार्गाने वाहन चालविणे व वळण घेणे आदी बाबींचे व्हिडीओ या चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांना दाखविण्यात येणार आहेत.

ज्यामध्ये वाहतुकीच्या नियमबाबत जनजागृती होईल असे मत पुणे महामार्ग पोलीस बारामती फाटा विभागाचे सहा. पोलीस निरीक्षक युवराज नांदरे यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

 

चित्र रथासाठी अमीर चिकनचे संचालक विजय मोरे, नगरसेवक योगेश ससाणे, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे, शरद पुजारी, गणेश धुमाळ, इनायत शेख, अजिंक्य भारद्वाज यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

३२ वे रस्ता सुरक्षा अभियान वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय व पुणे महामार्ग पोलीस विभागाचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्ग दर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रीतम यावलकर, पो.नि.राजन सस्ते, सहा. पो. नि. युवराज नांदरे, उपनिरीक्षक महेश कोंडुभरी, विनोद जोकार व बारामती फाटा चे सर्व पोलीस अंमलदार वाहतुकीच्या सुरक्षा अभियानाअंतर्गत नागरिकांमध्ये प्रबोधन करत आहेत.

यावेळी थेऊर फाटा येथे हेल्मेट न वापरणाऱ्या वाहन चालकांना गुलाबाचे फुल देऊन हेल्मेट वापरण्याची व वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर, पुणे आरटीओ चे निरीक्षक मिरजकर, महामार्ग पोलीस निरीक्षक राजन सस्ते, कुंजीरवाडीचे मा. सरपंच सचिन तुपे, शिवसेनेचे स्वप्नील कुंजीर, सुरेश कुंजीर, जयसिंग उंदरे, गोरख तुपे व इतर मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version