पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या वरच्या ध्वजाला आग

ओडिशा: ओडिशाहून एक मोठी बातमी समोर आली आहे की पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या वरच्या पवित्र ध्वजाला आग लागल्याची घटना घडली, हे एक अशुभ चिन्ह असल्याचे सांगण्यात आले. तेथे एक भव्य दीप ठेवण्यात आल्यावर ही आग लागली. विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे श्री जगन्नाथ मंदिर शुक्रवार ते ३१ मार्च दरम्यान भाविकांसाठी बंद राहणार होते. लोकांमध्ये अशी चर्चा चालू आहे की घडलेली ही घटना एक अशुभ संकेत असण्याची शक्यता आहे.

मंदिराचे मुख्य प्रशासक कृष्णा कुमार म्हणाले की मंदिरातील पुजारी आणि नोकरांना मंदिरात पूजा करण्यास परवानगी दिली जाईल. ते म्हणाले, “उद्यापासून 31 मार्चपर्यंत मंदिरात भाविकांचे प्रवेश स्थगित केले जातील.” मंदिरात पूजा विधी सुरूच राहतील. हे विधी करण्यासाठी केवळ पुजार्‍यांना मंदिरात प्रवेश घेता येणार आहे.

श्री जगन्नाथ मंदिर कारभारी समितीचे सदस्य रामचंद्र दशमहापात्र म्हणाले की, मंदिरात विधी व इतर धार्मिक विधी करण्याच्या पद्धतींबद्दल चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली जाईल. भाविकांसाठी मंदिर बंद करण्याविषयी बोलताना ते म्हणाले की बहुधा दीर्घकाळानंतर कदाचित ही प्रथमच वेळ असेल. जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना दोन दिवसांत पुरी येथील हॉटेल रिकामे करुन येथे येऊ नये असा सल्ला दिला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा