ईडन गार्डन स्टेडियमला भीषण आग, ड्रेसिंग रूम जळून खाक

कोलकाता, १० ऑगस्ट २०२३ : एकदिवसीय विश्वचषक २०२३ यावर्षी भारतात होणार आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी एक मोठी बातमी समोर येत आहे. कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन स्टेडियमला आग लागली असून स्टेडियमचे ड्रेसिंग रूम जळून खाक झाले आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री ११:५० वाजता आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना एक तासापेक्षा जास्त वेळ लागला. या भीषण आगीमुळे ड्रेसिंग रूमचे फॉल्स सिलिंग बरेचसे जळून खाक झाले आहे. याशिवाय ड्रेसिंग रूममध्ये ठेवलेले बरेच सामानही जळाले. यासोबतच क्रिकेटपटूंचे काही सामानही जळून खाक झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच आयसीसीच्या टीमने ईडन गार्डनला भेट दिली होती, अशी माहिती आहे. त्याचवेळी बंगाल क्रिकेट असोसिएशनने स्टेडियमच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत आयसीसीसमोर अहवालही सादर केला होता. पण, आता या आगीच्या घटनेमुळे बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र, आग कशी लागली, याचा तपास आता सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा