ठाणे, २१ ऑगस्ट २०२३: ठाणे जिल्ह्यातील एका पॉवरलूम कारखान्याला सोमवारी पहाटे भीषण आग लागली. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे भिवंडी निजामपूर महापालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले.
आगीत कच्चा माल, तयार माल आणि मशिनरी पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, भिवंडी शहराच्या हद्दीतील खोणी गावात असलेल्या पॉवरलूम कारखान्यात पहाटे ३.१५ च्या सुमारास आग लागली.
स्थानिक आपत्ती कक्षाचे प्रतिनिधीही घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी ८:३० च्या सुमारास आग आटोक्यात आली, तसेच आगीचे कारण तपासले जात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड












































