गोल पोस्ट राष्ट्रीय बेंगळुरू रेल्वेस्थानकावर उद्यान एक्स्प्रेसला आग, कोणतीही जीवितहानी नाही

बेंगळुरू रेल्वेस्थानकावर उद्यान एक्स्प्रेसला आग, कोणतीही जीवितहानी नाही

बेंगळुरू, १९ ऑगस्ट २०२३ : मुंबई-बेंगळुरु उद्यान एक्स्प्रेसमधून प्रवाशी उतरल्यानंतर रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभी होती. अचानक या काही डब्यांना आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बेंगळुरूच्या क्रांतिवीर सांगोली रामण्णा रेल्वे स्थानकावर उद्यान एक्स्प्रेस सकाळी साडेसातच्या सुमारास थांबली होती.

अचानक आग लागली आणि प्लॅटफॉर्मवर धूर पसरला. दोन डब्यांना आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच आगीचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version