पुणे, २२ जानेवारी २०२३ : अखिल भारतीय मराठी साहित्य संस्था शाखा लातूूरतर्फे लातूर येथील प्रकाशनगरमधील सरस्वती विद्यालयात मंगळवारी (ता. २४) होणाऱ्या पहिल्या बालसाहित्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ बाल साहित्यिक व व्यंगचित्रकार प्रकाश घादगिने यांची निवड करण्यात आली आहे. सकाळी १०.३० वाजता पुण्याच्या केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. प्रमुुख पाहुणे म्हणून डॉ. दिलीप गरुड, विलास रासकर, भरत सुरसे, संस्थेचे सचिव ॲड. एल. ई. भागवत, विजय जगताप, प्रशांत गौतम व मुख्याध्यापक कालिदास शेळके हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी राज्य शासनाचा साने गुरुजी बालकथा पुरस्कार मिळालेल्या लेखिका वृषाली पाटील व स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडच्या अधिसभा सदस्यपदी निवड झालेल्या उमा व्यास यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कथाकथन डॉ. दिलीप गरुड यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, त्यात ज्येष्ठ कथाकार जी. जी. कांबळे व शैलजा कारंडे सहभागी होणार आहेत.
ज्येष्ठ कवी भारत सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार असून, त्यात सर्वश्री रमेश चिल्ले, नागनाथ कलवले, कल्याण राऊत, वृषाली पाटील, उषा भोसले, सविता धर्माधिकारी, विमल मुदाळे, दतप्रसाद झंवर, छगन घोडके, गोविंद गारकर, रमेश हणमंते, क्रांती मोरे, विजया भणगे, सुनीता मोरे, प्रभा वाडकर, महेंद्र गायकवाड, सुलक्षणा सोनवणे, सीमा हिप्परगेकर, नंदिनी पुजारी, उमा व्यास, नीलिमा देशमुख यांचा सहभाग असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नयन राजमाने व सुनीता देशमुख, तर आभार राजकुमार दाभाडे मानणार आहेत, असे अध्यक्ष रमेश चिल्ले व सचिव नागनाथ कलवले यांनी कळविले आहे. शहरातील बालसाहित्यावर प्रेम करणारे विद्यार्थी व साहित्यिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील
