महाराष्ट्रातील कोरोनाबाबतचा पहिला गुन्हा दाखल

बीड : कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आशा आशयाचे एका तरुणाचे छायाचित्र वापरून समाज माध्यमांत पसरविणाऱ्या दोन जणांविरुद्ध पिडीत तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
कोरोनाची अफवा पसरवल्याप्रकरणी हा महाराष्ट्रातला पहिला गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. आष्टी तालुक्यातील ऋषिकेश वीर आणि प्रथमेश आवारे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरूणांची नावे आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ऋषिकेश वीर याने व्हॉट्सअॅपवर एका तरूणाच्या फोटोचे स्टेटस ठेवून आष्टी तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे अशी अफवा पसरवली होती. त्यानंतर ऋषिकेशचा मित्र प्रथमेश याने सुद्धा ही अफवा पसरवली. तसेच या दोघांनीही वृत्तवाहिन्यांची नावं वापरून कोरोना ब्रेक्रिंग, आष्टीत कोरोनाचा रुग्ण आढळला अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल केल्या होत्या.
परंतु ज्या तरूणाचा फोटो स्टेटसवर ठेवला होता त्याच्यापर्यंत ही माहिती पोहचली. सदरील तरूणाला तब्येतीची विचारणा करण्यासाठी नातेवाईकांचे फोन येऊ लागले. तरूणाने व्हॉट्सअॅपवर माहिती काढली असता त्याला ऋषिकेश वीर व प्रथमेश आवारे या दोघांनी ही अफवा पसरवल्याचे समजले. त्यानंतर या तरूणाने पोलिसात जाऊन दोघांवर खोटी अफवा पसरवल्याप्रकरणी तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे करत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा