दुबईत प्रथमच जिजाऊ जन्मोत्सव आणि आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे दुसरे महाअधिवेशन उत्साहात संपन्न

10

५ फेब्रुवारी २०२५ दुबई : संयुक्त अरब अमिरातीतील दुबई येथे प्रथमच जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आणि आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे दुसरे महाअधिवेशन मोठ्या उत्साहात साजरे झाले. या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना आणि जिजाऊंना वंदना करून गायनाने झाली. यावेळी दुबई मधील पहिल्या महिलांच्या “स्वामिनी ढोल-ताशा पथकाचे वादन झाले. त्यांनी आपल्या रोमांचक वादनातून उपस्थितांचे मन जिंकले. या सोहळ्यासाठी आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा मयुराताई देशमुख, दुबई शाखेच्या अध्यक्षा सुनीता देशमुख, तसेच जाई कदम सुर्वे, वृषाली म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा मयुराताई देशमुख यांनी जिजाऊ ब्रिगेडचे आतापर्यंतचे कार्य, वाटचाल आणि पुढे जिजाऊ ब्रिगेडची दिशा कशी असेल याबाबत उपस्थितांना माहिती दिली.
तसेच जिजाऊंच्या शिकवणीचे धडे देत आताच्या जीवनात स्त्रियांना त्याचा उपयोग कसा होईल याबाबत मार्गदर्शन केले. या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात काही महत्वाचे ठराव देखील मांडण्यात आले.

राष्ट्रमाता जिजाऊ ग्रंथालय” दुबई येथे स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव संमत.

शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर लिखित “शून्यांचा ताळमेळ” या पुस्तकाचे प्रकाशन.

डॉ. संजय वायाळ यांच्या हस्ते जिजाऊ ब्रिगेडच्या पुस्तिकेचे अनावरण.

समाजप्रबोधन करणाऱ्या भित्तीपत्रकांचे प्रदर्शन व महिलांना प्रेरणादायी पुस्तके भेट.

या कार्यक्रमात मिलिंद माणके यांनी छत्रपती शिवरायांवरील गायन सादर केले. सूत्रसंचालन ऋतुजा काळे-विचारे आणि प्रियांका भोसले, तर आभार प्रदर्शन शुभांगी पाटील यांनी केले.

या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी जिजाऊ ब्रिगेड, दुबईच्या सदस्यांनी अथक मेहनत घेतली. दुबई, अबू धाबी, शारजाह, अजमान, फुजैराह आणि रास अल खैमा येथील महिला मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा