जालना येथे ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी सुरू

जालना ४ ऑगस्ट २०२४ : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व भारत ईलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्याकडील तज्ञ अभियंताकडून 3984 बॅलेट युनिट, 2229 कंट्रोल युनिट आणि 2404 व्हीव्हीपॅट यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी म्हणजेच एफ एल सी सुरु करण्यात आलीय. जालना बस स्थानकाजवळील जुना मुंडा परिसरात असलेल्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ही तपासणी सुरू करण्यात आल्याची माहिती जालना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत 1 हजार 755 मतदान केंद्रे आहेत. तर जिल्ह्यात वापरा योग्य ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्राची संख्या पुढीलप्रमाणे आहे. यात सी.यु.3180, बी.यु. 5633, व्ही व्ही पॅट 3204 भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एकूण मतदान केंद्रांच्या 127 टक्के सी.यु. म्हणजेच 2229 तर 227 टक्के बी.यु. म्हणजे 3984 व 137 टक्के व्हीव्हीपॅट यंत्र म्हणजे 2404 ईव्हीएम व्हीव्ही पॅट यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी भारत ईलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्याकडील तज्ञ इंजिनिअर्सकडून तसेच जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समक्ष महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे जुना मोंढा या ठिकाणी केली जाणार आहे असं कळविण्यात आलंय.

न्युज अनकट प्रतिनीधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा