गोल पोस्ट महाराष्ट्र कुर्डूवाडी शहरात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू नगराध्यक्ष समीर मुलाणी

कुर्डूवाडी शहरात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू नगराध्यक्ष समीर मुलाणी

माढा, ८ सप्टेंबर २०२० : माढा तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुर्डूवाडी शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने दिनांक ९ सप्टेंबर १३ सप्टेंबर या कालावधीत पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लावला आहे.

अशी माहिती कुर्डूवाडीचे नगराध्यक्ष समीर मुलाणी यांनी दिली आहे. नगराध्यक्ष समीर मुलाणी यांनी व्यापारी व नागरिक यांची बैठक नगर परिषदेच्या सभागृहात बोलावली होती.त्यात हा निर्णय घेण्यात आला मेडिकल दूधविक्री यासह अत्यावश्यक सेवा दिलेल्या वेळेत चालू राहतील तर किराणा सर्व व्यापार व्यवसाय बंद राहतील असे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी जितेंद्र गायकवाड,संजय गोरे, भालचंद्र कांबळे, विजयसिंह परबत व्यापारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version