जळगावात पुन्हा अपघात, पाच जण जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक

जळगाव १८ मार्च २०२४ : जळगाव शहरातील खोटेनगर येथे वाटिका आश्रमाजवळ काल दुपारी अडीचच्या दरम्यान दोन चारचाकी वाहनामध्ये अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहेत. त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रहिवासी नंदनी विनोद पाटील, सचिन सुनील पाटील, विनोद सोपान पाटील, प्रतीक्षा सचिन पाटील, देवांश सचिन पाटील हे गाडी (क्रं. एम एच १२ डीएस २१८६) इंडिकाने जळगावरून एरंडोलला नातेवाईकांकडे जात होते. दरम्यान, खोटेनगर येथील वाटिका आश्रमा जवळ दुपारी २:४५ सुमारास समोरून येणारी पिकअप वाहन क्र. एमएच १८ ए ए ६०४२ भरधाव वेगात जळगावकडे येत असताना दोघांमध्ये समोरासमोर धडक झाली. यात जळगाव शहरातील रहिवासी नंदनी विनोद पाटील, सचिन सुनील पाटील, विनोद सोपान पाटील, प्रतीक्षा सचिन पाटील, देवांश सचिन पाटील हे जखमी झाले. त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, यात एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी याच परिसरातील महामार्गावर तीन जणांचा दुर्दैवी अपघात झाल्याची घटना घडली होती. यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. अशातच आज पुन्हा हा अपघात झाला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा