नाशिक, दि.६ जून २०२०: शहरामध्ये दरोड्याच्या तयारीने आलेल्या पाच दरोडेखोरांना नाशिक रोड पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे. या दरोडेखोरांकडून साऊथ इंडियन स्टाईल दोन तलवारी, नायलॉनची दोरी, मिरचीपूड तसेच दरोड्यासाठी लागणाऱ्या वस्तू जप्त करण्यात आले आहे.
नाशिकरोड जवळ असलेल्या कोठारी कन्या शाळेच्या जवळून पाठलाग करत या सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. या परिसरात ६ सराईत गुन्हेगार दरोड्याच्या तयारीने आले असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.
मात्र, त्या दरोडेखोरांना पोलिस मागावर असल्याची कुणकुण लागताच या दरोडेखोरांनी तिथून पळ काढला. कोठारी कन्या शाळेपासून सुरू झालेला हा पाठलाग जेलरोडच्या पाण्याच्या टाकीपर्यंत सुरू होता. हा पाठलाग सुरू असताना या संशयित दरोडेखोरांनी हाती असलेल्या तलवारी रस्त्यावर घासत दहशत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र या दबावाला झुगारून
अखेर सिनेस्टाईलने पाठलाग करून या दरोडेखोरांना नाशिकरोड पोलिसांनी ताब्यात घेतले.
या पकडण्यात आलेल्या ६ पैकी ५ आरोपींमध्ये सागर म्हस्के हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो यापूर्वी तडीपार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी दिली आहे.
उमेश बुचडे, ऋषिकेश निकम, सागर मस्के, अनिकेत जॉन, सिद्धार्थ धनेधर, असे या आरोपीचे नाव असून सर्व जण नाशिक रोड परिसरातच राहत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाला आहे. दरम्यान पोलिसांचा पाठलाग सुरू असताना यात भीमा श्रीवन हा पळून जाण्यात यशस्वी झाला. या पूर्वीच हे सर्व आरोपी हद्दपार असून सराईत गुन्हेगार आहे. या गुन्ह्यात पोलीस हवालदार कोकाटे, नाईक घुगे, कॉन्स्टेबल पाटील, शेख विखे आदींनी ही कारवाई केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: