गोल पोस्ट गुन्हा मध्य प्रदेशात अंदाधुंद गोळीबार, पाच ठार सहा जखमी

मध्य प्रदेशात अंदाधुंद गोळीबार, पाच ठार सहा जखमी

मध्यप्रदेश, १३ सप्टेंबर २०२३ : मध्य प्रदेशातील दतिया येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेंडा गावात, जमिनीच्या वादातून अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेत पाच जण ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. दतिया हा मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. आज सकाळी शेतातून गुरे पळवण्यावरुन दोन गट आमनेसामने आल्यानंतर हा प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी दतिया येथील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील रेंडा गावात, जमिनीच्या वाद सोडवण्यासाठी पाल आणि डांगी समाजातील लोक पंचायतीमध्ये एकत्र आले. यावेळी वाद झाला. पंचांनी शांत राहण्याचे आवाहन केले. पण काही उपयोग झाला नाही. काही वेळातच वाद वाढत जाऊन हिंसक वळण लागले. हाणामारीनंतर गोळीबार झाला.

पाच मृतांपैकी तीन डांगी समाजाचे तर दोन जण पाल समाजाचे आहेत. सहा जण जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version