नागरिकांच्या प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी कर्जत नगरपंचायतीची पाच पथके तयार.

कर्जत, २५ जुलै २०२० : कर्जत नगर पंचायतीने शहरातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी सुरुवात केली असून पाच पथके यासाठी कार्यरत आहेत.

कर्जत शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर कर्जत नगरपंचायतीने विशेष दक्षता घेत विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून यामध्ये शहरात पाच पथकाद्वारे नागरिकांच्या प्राथमिक तपासणीमध्ये शरीराचे तापमान तपासणी व ऑक्सिजनची लेव्हल तपासण्याचे काम केले जात आहे. यासाठी नगरपंचायतीचे कर्मचारी यांच्या बरोबरच त्या प्रभागातील नगरसेवक ही विशेष कार्यरत आहेत.

प्रभाग क्रमांक १२ मधील नगरसेविका उषा अक्षय मेहेत्रे राऊत यांनी स्वतः उपस्थित राहत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन या वेळी केले . अक्षय राऊत यांच्यासह नगरपंचायतीचे कर्मचारी  उमेश गलांडे, स्वप्निल वाघ, धनंजय आगम, राकेश गदादे, यांनी अक्काबाई नगर मध्ये घराघरात जाऊन तपासणी केली. नागरिकांनी ही त्यास विशेष सहकार्य केले. कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ प्रतिभा ताई भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून नागरिकांनी घरातच राहावे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन नगरसेविका उषा अक्षय मेहेत्रे राऊत यांनी केले आहे.

या प्रभागात राहणाऱ्या नगरपंचायतीच्या विरोधी पक्षनेत्या पूजा संतोष मेहेत्रे यांचे पती संतोष मेहेत्रे यांनी मात्र आपल्या घरातील व्यक्तींची तपासणी करण्यास नकार दिला.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा