पुणे २८ ऑक्टोबर २०२२: सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल याची कल्पना करणे थोडे कठीण आहे. अशातच सोशल मीडियावर दररोज हजारो नवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. तसेच ते वेगाने व्हायरलही होतात. एका लहान मुलाच्या प्रशिक्षणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. चला तर पाहू नक्की काय आहे या व्हिडिओमध्ये….
हा व्हिडिओ चीनमधील असून यामध्ये एका पाच ते सहा वर्षाच्या मुलाची ‘कुंग फू’ची ट्रेनिंग सुरू आहे. त्याच्या खांद्यावर एक लाकडाचा ओंडका असून तो दोन्ही पाय लांबवून उभा आहे. हा हृदयद्रावक आणि आत्याचारी व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
दरम्यान, कुंग फूचे प्रशिक्षण सुरू असून हा लहान मुलगा रडत आहे. त्याच्या खांद्यावर एक लाकडाचा ओंडका आहे. त्याचबरोबर तो तीन फूट उंचीच्या दोन लाकडांवर पाय लांबवून उभा आहे. त्याच्या खांद्यावर जवळपास १० ते १५ किलोंचा लाकडाचा ओंडका असून तो रडत आहे. त्यानंतर तो लाकडाचा ओंडका खाली पाडून उडी मारतो तरीही त्याला सूचना मिळत आहेत. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या हृदयद्रावक व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून हा आत्याचार असल्याचे मत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर हा कोणता प्रशिक्षणाचा प्रकार असा सवालही उपस्थित केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.