गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा लातूर इथल्या हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी ७२व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण

लातूर इथल्या हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी ७२व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण

लातूर, १७ सप्टेंबर २०२० : ७२ व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आज महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या विविध जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण आणि इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.

लातूर इथल्या हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी आज सकाळी संपर्कमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
हुतात्मा स्मारकाला मान्यवरांनी पुष्पचक्र वाहिल्यानंतर सलामी देण्यात आली.

यावेळी अमित देशमुख यांच्या हस्ते माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेत काम करणाऱ्या आशा सेवीकांना तपासणी किट आणि सुरक्षा किटचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version