गोल पोस्ट महाराष्ट्र नाशिक नाशिकच्या नांदगावमध्ये देहविक्री रॅकेट उघडकीस, तालुका बनतोय गुन्हेगारीचा अड्डा

नाशिकच्या नांदगावमध्ये देहविक्री रॅकेट उघडकीस, तालुका बनतोय गुन्हेगारीचा अड्डा

नाशिक ३० ऑक्टोबर २०२३ : नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील वाखारी शिवार, नाग्या साग्या धरणा जवळ हाॅटेल गोल्डन पॅलेसवर पोलिसांची धडक कारवाई केली. तसेच हॉटेल गोल्डन पॅलेस याठिकाणी नाशिक ग्रामीण पोलीस आणि नांदगाव पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत देहविक्री रॅकेट उघडकीस आले आहे.

याबाबत माहिती अशी की, नाशिक ग्रामीण पोलीस पथक आणि नांदगाव पोलिसांनी नागासाग्या धरणालगत असलेल्या हॉटेल गोल्डन पॅलेस येथे बनावट ग्राहकास पाठवले होते. त्यावेळी त्याच्याकडून पैसे स्वीकारुन पीडित महिला आणि अन्य साथीदार पथकाच्या जाळ्यात अडकले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित मोहम्मद अख्तर शमीम सोनावाला, मॅनेजर सचिन इंगळे, ज्ञानेश्वर मोरे, संदिप जाधव, वाल्मिक माळी, संजय मेंगनर आणि देहविक्री करणाऱ्या दोन महिलांना अटक केली आहे.

यावेळी पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम रुपये ५ हजार ७० रुपये आणि ४३ हजार रुपये किमतींचे मोबाईल, कामोत्तेजक स्प्रे, महागडे गर्भनिरोधक असा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाई मुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

error: Content is protected !!
Exit mobile version