मुंबईत आज दाखल होणार ” निसर्ग ” उड्डाणे रद्द, घरातच राहण्याचे आवाहन

मुंबई, दि. ३ जून २०२०: कोरोना आधीपासूनच महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये कहर माजवत आहे , त्यात आता निसर्ग नावाचे चक्रीवादळ आज किंवा संध्याकाळी आपला धोका दर्शवेल . जेंव्हा वादळ आदळेल तेव्हा ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. इतिहासात पहिल्यांदाच मुंबईला इतक्या मोठ्या वादळाचा आणि मुसळधार पावसाचा सामना करावा लागणार आहे. मुंबईकरांना मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा सामना करण्याची सवय आहे, परंतू ताशी १२० किमी वेगाने वाहणारे वारे मुंबईकर पहिल्यांदाच पाहतील.

आज या मोठ्या वादळाचा फटका मुंबई, पालघर, अलिबाग आणि ठाण्यातही पाहायला मिळणार आहे. चक्रीवादळ निसर्गाच्या पार्श्वभूमीवर इंडिगो एअरलाइन्सने मुंबईकडे जाणा-या आपल्या तीन फ्लाईट वगळता इतर १७ फ्लाईट रद्द केल्या आहेत.

रायगडमधील अलिबागमध्ये निसर्गमुळे लँडफॉल होण्याची शक्यता आहे. बधवारी मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात व उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज या वादळाचा वेग मुंबई, रायगड, पालघर आणि ठाण्यात वादळी वाऱ्यासह ताशी १२० किमी पर्यंत पोहोचू शकतो. या वादळामुळे समुद्राच्या लाटा १-२ मीटर उंच राहिल्यास मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील सखल भागात पाणी भरण्याची शक्यता आहे.

याचा परिणाम कोणत्या भागात होणार

महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर नजर टाकल्यास त्याचा गंभीर परिणाम सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर , दमण आणि गुजरातमधील नवसारी या भागात होऊ शकतो. या वादळाच्या वाढत्या परिणामामुळे प्रत्येकाच्या मनाला धडकी भरली आहे. तटरक्षक दलाच्या जवानांनी समुद्रात जाणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा