नागपूरात पूरपरिस्थिती, पूरग्रस्तांना तात्काळ मदतीचे फडणवीसांचे प्रशासनाला आदेश

नागपूर, २३ सप्टेंबर २०२३ : नागपूरमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले आहे. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले असुन शहरातील अनेक घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये तब्बल पाच फुटांपर्यंत पाणी शिरले आहे. पुरपरिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पुरात अडकलेल्या नागरिकांना तात्काळ मदत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

नागपूरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या चार तासांत १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.

सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या दोन टीम बचाव कार्यांत तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. तसेच नागपूरमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या परिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा