नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार, ५ जणांचा मृत्यू तर २८ हून अधिकजण बेपत्ता

नेपाळ १९ जून २०२३: नेपाळच्या पूर्वभागात अचानक आलेला पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार उडाला आहे. यात ५ जणांचा मृत्यू झालाय तर सुमारे २८ पेक्षा अधिकजण बेपत्ता आहेत. गेल्या आठवड्यात या भागात पावसाला सुरुवात झाली होती. पूर्व नेपाळमधील संखुवासभा जिल्ह्यात, हेवा नदीवर उभारण्यात येत असलेला जलविद्युत प्रकल्प मुसळधार पावसाने वाहून गेला. या दृर्घटनेत १६ कामगार बेपत्ता झाले, पोलिस बेपत्ता मजुरांचा शोध घेतायत अशी माहिती सरकारी अधिकारी बिमल पौडेल यांनी दिली आहे.

पूर्वेकडील भागात भारताच्या सीमेला लागून असलेल्या तपलेजूंग आणि पंचथर जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या पुर आणि भूस्खलनात ९ जण बेपत्ता झाले तसेच रात्रभर पडलेल्या पावसामुळे मेची महामार्गावरील दोन पुलांचे नुकसान झाले आहे. दुर्गम तपलेजूंग जिल्ह्यांचा संपर्क तुटला असून, मुसळधार पावसामुळे बचाव पथकातील कर्मचाऱ्यांना डोंगराळ सिडिंगवा गावात पोहोचता आलेले नाही.

नेपाळमध्ये साधारणपणे जूनच्या मध्यावधीला पाऊस सुरू होतो आणि सप्टेंबरपर्यंत तो कायम राहतो. चीन आणि भारत दरम्यान वसलेल्या नेपाळच्या बहुतांश पर्वतीय भागात दरवर्षी अनेक गावे, शेतपिके आणि पायाभूत सुविधांचे पावसामुळे नुकसान होते.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा