गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पिठाची गिरणी अर्ध्या किंमतीत

अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पिठाची गिरणी अर्ध्या किंमतीत

बारामती, दि. ०८ ऑगस्ट २०२०: बारामती तालुक्यातील माळेगाव येथील जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांनी महिलांना अर्ध्या किंमतीत पिठाची गिरणी उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमाला महिलांचा मोठा उत्साह असल्याचे रोहिणी तावरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६१ व्या वाढदिवसा निमित्ताने माळेगाव पणदरे या जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद सदस्या रोहिणी रविराज तावरे यांच्या माध्यमातून ६१०० रुपये किमतीची सर्वसामान्य लोकांना ५०% सवलतीच्या दरात घरगुती पीठ गिरणी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या पिठाच्या गिरण्या ISO मार्क प्रमाणित असून २ वर्षे वॉरंटी आहे.

त्यामुळे लोकांची एक जीवनावश्यक गरज या माध्यमातून पूर्ण होत आहे. कोरोना काळात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना आज रोहिणी तावरे तसेच माजी सरपंच दिपक बापू तावरे, कल्याण पाचांगणे, नितीन तावरे, रविराज तावरे यांच्या हस्ते व केतन घुले, आशिष कोकरे, सुरज हिवरकर, बापू सस्ते, संतोष जाधव, संतोष भिसे, अक्षय कोकरे यांच्या उपस्थिती गिरणी वाटप करण्यात आली असुन ५०० गिरण्यांच्याचा टप्पा पार करण्यात आला, असल्याचे रोहिणी  तावरे यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव.

error: Content is protected !!
Exit mobile version