रस्त्यावर ठोकलेल्या खिळ्यांच्या जागी शेतकऱ्यांनी लावली फुलांची रोपे

नवी दिल्ली, ६ फेब्रुवरी २०२१: दिल्ली सीमेवर शेतकरी आणि सरकार यांच्यतील विरोध दररोज वेगवेगळ्या पातळीवर पोहोचत आहे. पूर्वी पंतप्रधान म्हणाले की ते शेतकर्‍यांपासून फक्त एकच हाकेच्या अंतरावर आहेत आणि त्यानंतर पोलिसांनी गाझीपूर व टिकरी सीमेवर १० ते १२ थरांचे बॅरिकेड्स लावले, यात रस्त्यावर खिळे देखील ठोकले गेले. ज्याचा सर्वत्र विरोध होता. परंतु सरकारने यात हस्तक्षेप करून ते खिळे काढून टाकण्यास सांगितले. तेव्हा स्थानिक प्रशासनाने हे खिळे काढण्यास सुरुवात केली. पण यादरम्यान आणखी एक सुंदर दृश्य समोर आले.

सरकारने ज्या ठिकाणी खिळे लावले होते त्या ठिकाणी आता फुलांची लागवड करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यासाठी दोन डंपर मातीही गाझीपूर सीमेवर आणण्यात आली आहे. गाझीपूर सीमेवर धरणेवर बसलेल्या शेतकर्‍यांचे नेते राकेश टिकैत ज्या ठिकाणी खिळे आहेत तेथे रोपे लावण्याचे काम करीत आहेत.

कालपर्यंत जेथे सरकारने लावलेले खिळे दिसत होते, तेथे आता शेतकऱ्यांनी लावलेले फुले दिसतील. संसद अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता लक्षात घेता, गाझीपूर सीमेवर पोलिसांनी मुख्य रस्त्यांना केवळ बॅरिकेड्स च लावले नाही तर काटेरी तारांनी रस्त्यांना बंद देखील केले.

इतकेच नाही तर आजूबाजूच्या जंगलातील रस्त्यांना देखील काटेरी तारांनी बंद करण्यात आले. यामुळे केवळ शेतकर्‍यांनाच त्रास झाला नाही तर शेजारच्या रहिवाशांनाही त्रास झाला, कारण रस्ता बंद झाल्यानंतर ते फक्त जंगलातूनच जाऊ शकत होते. आता शेतकऱ्यांनी सरकारला उत्तर देण्याची तयारी केली आहे. पोलिस-प्रशासनाद्वारे जिथे जिथे खिळे लावण्यात आले तेथे तेथे फुलांची रोपे लावली जात आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा