सीमेवरील योद्धांकडून कोरोनाशी लढणाऱ्या योद्धांवर होणार पुष्पवर्षाव

नवी दिल्ली, दि. ३ मे २०२०: कोरोनाच्य योद्ध्यांना आज सीमेवरचे योद्धे सलामी देणार आहेत. आज कोरोनासाठी लढत असलेल्या सर्व सफाई कामगार, डॉक्टर, रुग्ण सेवक, वैद्यकीय कर्मचारी, परिचारिका आणि इतर सर्व कोरोनाला पराभूत करणाऱ्या योद्धांना सैन्याच्या तीन शाखांचे सैनिक आभार प्रकट करत त्यांच्यावर पुष्प वर्षाव करतील. हे दृश्य पूर्ण देशभर दिसून येणार आहे.

सैन्याने यासाठी विस्तृत व्यवस्था केली आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी शुक्रवारी जाहीर केले की सैन्याच्या तीनही शाखा कोरोना कामगारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतील. दिल्लीतील पोलिस स्मारकात श्रद्धांजली वाहून या कार्यक्रमाची सुरुवात होईल. यानंतर, हवाई दल देशभरात उड्डाण करतील.

कसे असेल नियोजन:

पहिला फ्लाइ पास्ट श्रीनगर ते त्रिवेंद्रम असा असेल तर दुसरा फ्लाइ पास्ट दिब्रुगड ते कच्छ येथे होईल. या फ्लाइ पास्ट मध्ये भारतीय हवाई दलाची वाहतूक विमाने आणि लढाऊ विमानांचा समावेश असेल. नेव्ही हेलिकॉप्टर्स कोरोना रुग्णालयावर फुलांचा वर्षाव करतील. भारतीय सैन्य देशभरातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांमधील कोविड रुग्णालयात माउंटन बँडचे सादरीकरण करेल. दुपारी ३ नंतर नौदल युद्धनौका रोशन नगर येथे येतील. पोलिस दलाच्या सन्मानार्थ सशस्त्र सेना पोलिस स्मारकावर पुष्पहार अर्पण करतील.

दिल्ली, मुंबई, जयपूर, अहमदाबाद, गुवाहाटी, पटना आणि लखनऊ या शहरांमध्ये विमानं उड्डाण घेतली. श्रीनगर, चंदीगड, दिल्ली, जयपूर, भोपाळ, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, कोयंबटूर आणि तिरुअनंतपुरम या शहरांमध्ये ट्रासपोर्ट एयरक्राफ्टने फ्लाई पास्ट केले जाईल.

हॉस्पिटलच्या बाहेर ऐकू येणार सैन्य बँड चा सुर:

सकाळी १० वाजता एम्स, कँट बोर्ड हॉस्पिटल आणि नरेला हॉस्पिटलच्या बाहेर आर्मी बॅन्डचे सादरीकरण करेल. सकाळी १०.३० वाजता बेस हॉस्पिटलमध्ये आर्मी बँडचा सूर ऐकू येईल. सकाळी ११ वाजता माउंटन बँडचे सादरीकरण गंगाराम हॉस्पिटल व आर अँड आर हॉस्पिटलच्या बाहेर असेल.

या ठिकाणी होणार पुष्पवर्षाव :

चेन्नईमध्ये सलाई रुग्णालय आणि राजीव गांधी सामान्य रुग्णालयात साडेदहा ते ११.१५ च्या दरम्यान पुष्प वर्षाव होईल. मुंबईत केईएम हॉस्पिटल, कस्तुरबा गांधी हॉस्पिटल आणि जेजे हॉस्पिटलमध्ये सकाळी १० ते ११ या वेळेत पुष्प वर्षाव होईल. जयपूर येथे सकाळी १०.३० एयरफोर्ट हेलिकॉप्टर एसएमएस रुग्णालयात फुलांचा वर्षाव करतील. लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमध्ये सकाळी १० वाजता आणि पीजीआय येथे सकाळी साडेदहा वाजता पुष्प वर्षाव होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा