दिल्ली, १३ सप्टेंबर २०२२:वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने सोमवारी ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणाच्या देखभालक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी याचिका फेटाळून लावली आणि पूजा करण्याचा अधिकार मागणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २२ सप्टेंबर २०२२ रोजी होणार आहे.
न्यायालयाच्या या निर्णयाने हिंदू गोटात आनंदाची लाट उसळली आहे. त्याचे त्यांनी स्वागत केले आहे. त्याचवेळी, या सगळ्यामध्ये आणखी दोन महत्वाच्या मुद्द्यांवरही सुनावणी होणार आहे.
श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही मशीद इदगाह वादशी संबंधीत पूनर्वीचार याचिकेवर न्यायालयाने सुनावणी १३ सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे. आज दिल्लीतही अशाच प्रकारची सुनावणी होणार आहे. हे प्रकरण कुतुबमिनार संकुलात पूजा करण्यास परवानगी देण्याच्या मागण्याची संबंधित असून त्याची सुनावणी दिल्लीच्या साकेत न्यायालयात होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड