अमरावती, दि.३०एप्रिल २०२०: विवाह बंधनाला समाजात एक वेगळाच मान दिला जातो. मानवाचा जन्म दोनदा होत असतो एक जन्म घेताना व दुसरा म्हणजे लग्न झाल्यावर. लग्न गरीब कुटुंबातील असो वा श्रीमंत कुटुंबातील दोन्ही बाजूमध्ये समाजामध्ये सारखाच मान मिळतो. एकीकडे कोरोनाचे संकट डोक्यावर नाचत असताना त्यांनी संकटावर मात करून घरीच आपला लग्न समारंभ संपन्न केला.
उन्हाळ्याची चाहूल लागली की लग्न समारंभाला सुरुवात होत असते. परंतु यावर्षी कोरोना नावाच्या विषाणूची धमाकेदार एंट्री झाली व लग्नात अडथळे निर्माण होऊ लागले. परंतू त्यावर मात करून अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील २९ एप्रिलला विवाह सोशल डिस्टन्स ठेवत पार पडला.
त्यामध्ये तालुक्यातील खळवाडी येथील प्रतिष्ठित शेतकरी अशोक बोबडे यांचा मुलगा सर्वेश बोबडे व कविथा येथील विठ्ठल बाजड यांची मुलगी प्रणिता बाजड त्यांचा विवाह मास्क व रुमाल बांधून घरगुती व साध्या, आणि सोप्या पद्धतीने पार पडला. विशेष म्हणजे जास्तीत जास्त वायफळ खर्च न करता साध्या, आणि पारंपारिक पद्धतीने विवाह संपन्न झाला. या विवाहाला घरातील मोजकीच मंडळी उपस्थित होत्या.
न्युज अनकट प्रतिनिधी