दोन वर्ष पुरेल एवढा केंद्राकडे अन्नधान्य साठा: रावसाहेब दानवे

जालना, दि.२० मे २०२०: केंद्र सरकारकडे पुढील दोन वर्षे देशातील जनतेला पुरेल इतका अन्नधान्य साठा उपलब्ध आहे. पुढील वर्ष देखील तोंडावर आल्याने कोणत्याही प्रकारची अन्नधान्य टंचाई जाणवणार नाही, असे मत केंद्रीय अन्नपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केले. मंगळवारी(दि.१९) रोजी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

त्याचप्रमाणे कोरोना प्रतिबंधात्मक उपायाबाबत कडक उपाययोजना केल्या गेल्या नाही, तर महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी भिती देखील केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे.

कोरोना महामारीशी तोंड देण्यासाठी केंद्र सरकार सज्ज असुन केंद्राने ठरविलेल्या अराखड्यानुसार सर्व राज्य काम करित आहेत. ज्या राज्यांनी केंद्राच्या नियमांची अंमलबजावणी केली. त्या राज्यात कोरोना संसर्ग आटोक्यात देखील आला आहे. कोरोना महामारीमुळे डबघाईस आलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तब्बल २० लाख कोटींचे पॅकेज केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा