गोल पोस्ट क्रीडा फुटबॉल देशातील फुटबॉल खेळाडूंना कोरोनाची लागण

देशातील फुटबॉल खेळाडूंना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत. सीरि ए, इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, बुंदेसलिगा आदी फुटबॉल लीग रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच युरोपमधील विविध क्लबच्या अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. कोरोना लागण झालेल्यांची संख्या झपाट्यानं वाढत होत आहे. त्यात स्पॅनिश फुटबॉल क्लब व्हॅलेंसियानं त्यांच्या क्लबमधील ३५ टक्के साहाय्यक कर्मचारी आणि खेळाडू यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.
क्लबच्या प्रशिक्षक स्टाफ आणि खेळाडूंच्या काही चाचणी करण्यात आल्या आणि त्या पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version