कळंब तालुक्यासाठी असणारा आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा जिव्हाळा

उस्मानाबाद, ९ ऑगस्ट २०२०: उस्मानाबाद तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे या आधीच म्हटले होते की, कळंब तालुक्यासाठी मला जिव्हाळा कायमच राहील. कळंब तालुक्यामध्ये देखील आता कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढतच जात आहे. तरी, अशा परिस्थितीत कळंब शहर तसेच कळंब तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्ण आढळलेल्या गावांमध्ये भेटी देऊन ते नागरिकांशी चर्चा करून त्यांचे मनोबल वाढवत आहेत.

राणाजगजितसिंह पाटील हे उस्मानाबाद तुळजापूर येथील आमदार असून देखील, कळंब तालुक्यासाठी असणाऱ्या त्यांच्या जिव्हाळ्यामुळे आज दिनांक ९ ऑगस्ट रोजी कळंब शहरातील कंटेन्मेंट भाग शेरी गल्ली तसेच कळंब तालुक्यातील दहिफळ, खामसवाडी, वडगाव या ठिकाणी नागरिकांना प्रतिकार क्षमता वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या तसेच सॅनिटाइजर यांचे वाटप केले.

कळंब तालुक्यातील  कंटेन्मेंट भागात, कोरोना बाधीत रूग्ण आढळलेल्या गावांमध्ये आ. राणाजगजितसिंह पाटील हे भेट देऊन तेथील नागरिकांशी चर्चा करतात. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मदतीचे आश्वासन देखील देतात. या सोबतच कंटेन्मेंट भागातील असलेल्या नागरिकांशी काळजी घेण्यात यावी, कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, अशा सूचना ते तेथील संबंधित अधिकाऱ्यांना देतात. आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या या कामांतून त्यांचा कळंब तालुक्यासाठी असणारा जिव्हाळा हा साफ दिसून येतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा