गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा प्रभाग रचना ठरवण्यासाठी विशेष ग्रामपंचायत सभेचे आयोजन

प्रभाग रचना ठरवण्यासाठी विशेष ग्रामपंचायत सभेचे आयोजन

इंदापूर (प्रतिनिधी): ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना व प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर करण्याकरिता इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी (दि.२७) रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत निवडणूक अधिकारी एस. बी. कारंडे, तलाठी बी. बी. पाटील, ग्रामसेवक तुकाराम शिंदे सरपंच मीरा अमोल तोरवे, पोलीस पाटील तोरवे यांचा उपस्थितीत वार्ड रचनेचा प्रशासनाने बनविलेला नकाशा दाखविण्यात आला. तलाठी पाटील यांनी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यास सुरुवात केली.

विशेष ग्रामसभेत जाहीर करण्यात आलेली प्रभाग आरक्षणे :

प्रभाग एक :- १) अनुसूचित जाती आणि  सर्वसाधारण वर्ग२ जागा,

प्रभाग दोन :- १) नागरिकांचा मागास प्रवर्ग  १ आणि   सर्वसाधारण २ जागा

प्रभाग तीन :- १) नागरिकांचा मागास प्रवर्ग १ आणि सर्वसाधारण १ जागा असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

यावेळी आयोजित ग्रामसभेत ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य,पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version