आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त नाशिकच्या चांदवडमध्ये प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे भव्य कृषि प्रदर्शन

4

नाशिक १ डिसेंबर २०२३ : आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ.आत्माराम कुंभार्डे यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात रेणुका कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त चांदवडमध्ये प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे भव्य कृषि प्रदर्शन भरविण्यात आले आहे. चांदवड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावरती हे कृषि प्रदर्शन ४ डिसेंबर पर्यंत चालणार असुन नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उदघाटन होत आहे. अशी माहिती आमदार राहुल दादा आहेर यांनी दिली. यावेळी आहेर म्हणाले की कृषी प्रदर्शन हे मुख्यता शहरी भागामध्ये होतात, परंतु शेतकरी हा ग्रामीण भागात राहत असल्यामुळे मूळ शेतकऱ्यापर्यंत त्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांना मिळाव्यात या हेतूने हे प्रदर्शन चांदवड येथे होत आहे.

अलीकडच्या काळात अनेक उपक्रमशील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेत शेती जोपासत आहेत. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशी कृषी प्रदर्शने भरवणे हि काळाची गरज बनली आहे. त्यामुळे चांदवड सारख्या ग्रामिण भागात रेणुका कृषी महोत्सव होत असून येथे बी बियाणांपासून ते शेतीच्या प्रत्येक अवजारापर्यंतची माहिती इथं मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. सध्याच्या काळात कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे व्यासपीठ मिळू लागले आहे. दरम्यान या कृषी प्रदर्शनात खते, आधुनिक तंत्रज्ञान, औषधे, बी-बियाणे, अवजारे, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर्स, फार्म इक्विपमेंट, सिंचन, फलोत्पादन, पॅकेजिंग, साठवणूक, शासकीय विभाग, ऍक्वाकल्चर, बायोटेक्नॉलॉजी, टिश्यू कल्चर, पाणी व्यवस्थापन, ऑटोफार्मिंग टेक्नॉलॉजी, सौर ऊर्जा, डेअरी इक्विपमेंट, पोल्ट्री सोल्युशन, कृषी अर्थसहायय, कृषी साहित्य, नियतकालिके असे अनेक स्टॉल असणार आहेत.

या कृषी महोत्सवात चांदवड, देवळा, मनमाड, सटाणा, लासलगाव, निफाड, नांदगाव कळवणसह परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन, पॉलिहाऊस, नवनवीन बियाणे, नवीन यंत्रसामुग्री, महाराष्ट्र शासनान कृषी विभागाच्या विविध योजना, बँकिंगच्या विविध स्कीम, बचत गटातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे, शेतीपूरक नवीन उद्योजकांची, माहिती, कांदा पीक, द्राक्ष पिक त्याचबरोबर मका या पिकांवरती तज्ञांचे मार्गदर्शन शिबिरे या सर्व गोष्टींचे आयोजन या कृषी प्रदर्शनाद्वारे होणार आहे. म्हणूनच शेतकरी वेगवेगळ्या कृषी प्रदर्शनांची वाट पहात असतो आणि या कृषी प्रदर्शनांना भेट देऊन तो आणखीन चांगली शेती करण्यासाठी प्रगल्भ होतो.

न्युज अनकट प्रतिनीधी : नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा