जलालपूर, १५ ऑगस्ट २०२०: संपुर्ण देशात आज १५ ऑगस्ट हा स्वतंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुले पहाटेच उठतात आंघोळ करून नवीन इस्त्री केलेले कपडे घालून शाळेत जातात. डोक्यावर टोपी हातात झेंडा आणि खिशाला तिरंगा हा लहान मुलांचा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केलेला पोशाख असतो.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात इतिहासात पहिल्यांदाच असे घडेल की, ना विद्यार्थी ना भाषणे ना सांस्कृतिक कार्यक्रम ना विद्यार्थी वर्गाचा सन्मान. या वर्षी शाळा काॅलेज महाविद्यालय हे सर्व आज देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले पाहण्यास मिळत आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये संपुर्ण जगावर व देशात कोरोनाचे संकट असल्याने सर्व राष्ट्रीय कार्यक्रम देखील रद्द केली आहे.किंवा ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडत आहेत.
जलालपूर येथे ही काहीसे असेच दृश्य पाहण्यास मिळाले आहे. गावात वेगवेगळ्या ठिकाणी ध्वजारोहण पार पडले. मराठी शाळा,हायस्कूल,ग्रामपंचायत कार्यालय, सोसायटी कार्यालय, या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषद मराठी शाळा जलालपूर या शाळेच्या मुख्याध्यापिका लोटके मॅडम यांनी ध्वज फडकवला.
या वेळी तलाठी मखरे,गावातील सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायतचे आजी माजी सदस्य तसेच अमोल रसाळ सर,जाधव सर ,झेंडे सर ,हायस्कूलचे मुख्यध्यापक शिंगाडे सर,चव्हाण सर ,चिंतळकर सर ,दोन्ही शाळेचे सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष