माढा शहरात प्रथमच ”एक गाव एक गणपती” संकल्पना 

माढा, दि.२३ ऑगस्ट २०२०: सोलापूर जिल्ह्यातील माढा हे तालुक्याचे ठिकाण असून या शहरात नगरपंचायत स्थापन आहे. या शहराची लोकसंख्या १० हजार असून देखील या शहराच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांनी शहरवासीयांना ‘एक गाव एक गणपती’ स्थापन करण्याचे आव्हान केले. शासनाच्या निर्बंधाचे पालन करणे गरजेचे असून यामुळे सर्वांना त्याचा फायदा होईल, असे नगराध्यक्षा मीनल साठे यांनी शहरवासीयांना आव्हान केले. याला तरुणाईने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असून माढा शहरात एकाच ठिकाणी गणपतीच्या सर्व मंडळांनी एकत्र येऊन ‘एक गाव एक गणपती’ स्थापन केला आहे.

“एक गाव एक गणपती” ही संकल्पना माढा शहरात प्रथमच साकार झाली असून, माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांनी गणेश उत्सवात नगरपंचायतीत बैठक बोलावण्यात आली, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला व सर्व नगरसेवकांनी एकमताने ठराव मंजूर केला. यावेळी शहरातील छोटे-मोठे ३१ गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व गणेश मंडळांनी या निर्णयाचे स्वागत केले.

शहरातील सर्व गणेश मंडळांना सकाळी व संध्याकाळी आरतीसाठी पूजेचा मान देण्यात येईल असेही ठरले. तसेच दहा दिवसात सर्व गणेश मंडळांनी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण इत्यादींचे आयोजन केले जाईल असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी चरण कोल्हे ही उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा