सेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे होणार? शिंदे गटाकडून तयारी सुरू

12

मुंबई, २४ सप्टेंबर २०२२: राज्यात सत्ता संघर्ष झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे असंख्य आमदार फोडत नवीन सरकार स्थापन केलं आणि शिवसेना पक्ष ही आमचाच असा दावा केला आहे. त्यामुळे शिवसेना ही आमचीच आहे, असं शिंदे गटातील नेत्यांकडून वारंवार बोलले जात आहे. त्यामुळे दसरा मेळावा शिंदे घेणार का उद्धव ठाकरे हा वाद थेट कोर्टात, गेला आणि कोर्टाने शिवाजी पार्कचा दसरा मेळावा ठाकरेंच्या पारड्यात टाकला आहे.

पण सेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवशी दोन दसरा मेळावे होणार आहेत. यामुळे शिवसेनेला दोन गटामुळे पक्षाची परंपरा असलेला दसरा मेळाव्याला फटका बसणार आहे. दसरा मेळावा वाद वरून मुंबई हायकोर्टाने ठाकरे च्या बाजूने निकाल दिला असला तरी पण शिंदे गट सुद्धा दुसरा मेळावा घेणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बिकेसीतल्या एमआयडीसी च्या मैदानात शिंदे, गटाचा दसरा मेळावा होणार आहे. शिवसेनेचे राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एका दिवशी शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहेत.

बीकेसी मध्ये दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर BKC मैदानात शिंदे गटने चार जेसीबी लावून जमीन समांतर करत मैदानाची साफसफाई करण्यात सुरुवात केली आहे. तर शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी लाखभर गर्दी च टार्गेट ठेवला आहे. कोर्टाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल नाही दिल्याने शिंदे गट आता हायकोर्टात जाणार असल्याचं समोर येत आहे. तर दुसऱ्या दसरा मेळाव्यात ठाकरे आणि महाविकास आघाडीवर शिंदे गट कोणते आरोप प्रत्यारोप करणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागणार आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा