मुंबई, १९ सप्टेंबर २०२०: कोरोनाच्या सुरुवातीस मुंबई भारतातील हॉटस्पॉट शहर ठरलं होतं. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगर पालिकेनं प्रचंड खर्च केला होता. नंतरच्या काळात ते थोडं नियंत्रणात देखील आलं. मात्र यादरम्यान मुंबई महानगर पालिकेनं १३०९ कोटींचा खर्च केलाय. यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिकेने आत्ता पर्यंत आपल्या बँकेतील ठेवींना काही हात घातला नव्हता परंतु या कोरोनानं ते देखील करण्यास मुंबईला भाग पाडलंय.
कोरोनातील लॉक डाऊनमुळं सर्व अर्थ चक्र देखील थांबली होती. त्यामुळं मुंबईला मिळणार महसूल देखील थांबला होता. यामुळंच मुंबई महापालिकेला पहिल्यांदाच बँकेत असलेल्या ठेवींना हात घालावा लागलाय. आतापर्यंत कोरोना संदर्भातील गोष्टींवर सुमारे १,३०० कोटी रुपयांवर खर्च करण्यात आलाय. ज्यापैकी ९०० कोटी रुपये हे आकस्मिक निधीतून काढण्यात आले आहेत. तर उर्वरीत निधीसाठी बँकेतील ठेवींना हात घालावा लागलाय. अशी देखील माहिती समोर आलीय की, राज्य सरकारनं कोरोना संकटासाठी मुंबई महापालिकेला १ हजार कोटी रुपयांची मदत केलीय.
किती आहेत ठेवी
महापालिकेच्या विविध बँकांमध्ये सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यातच या ठेवींवरील व्याजदरही कमी झालेले असल्यानं यंदा १,४०० कोटी रुपयांचं व्याजही कमी मिळणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे