कोची, २२ सप्टेंबर २०२० : भारतीय नौदलाच्या इतिहासात प्रथमच दोन महिला अधिका-यांची युध्दनौकेवरील हेलिकॉप्टर ताफ्यात निरीक्षक किंवा हवाई रणनीतिज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. युध्दनौकेवरील लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाण करण्याचा मान सब लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि सब लेफ्टनंट रिती सिंह यांना मिळणार आहे.
युध्दनौकेवरील हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून नियुक्ती झालेल्या त्या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत केवळ जमिनीवरूनच उड्डाण आणि उतरणा-या विमानांचे वैमानिक म्हणून यापुर्वी महिलांची भूमिका मर्यादित होती नौदलाने अलिकडेच भरती केलेल्या १७ महिलांच्या गटापैकी सब लेफ्टिनंट कुमुदिनी त्यागी आणि रिती सिंह आहेत. येथील नौदलाच्या INS गरूड या नौदलाच्या तळावर सोमवारी झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये यापैकी नौदलातील चार महिला अधिका-यांचा आणि भारतीय तटरक्षक दलातील तीन महिला अधिका-यांचा समावेश आहे.
नौदल पदक आणि विशिष्ट सेवापदक विजेते रीअर अैडमिरल आणि चीफ ऑफ ऑफिसर (प्रशिक्षण विभाग) अैन्टोनी जॉर्ज या परेडच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यावेळी अैन्टोनी जॉर्ज यांनी नौदलातील पदवीधारक अधिका-यांचे अभिनंदन केले. हेलिकॉप्टर उड्डाणाचे प्रशिक्षण प्रथमच महिलांनी घेतले असून ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. या माध्यमातून महिला अधिका-यांच्या भारतीय नौदलातील आघाडीच्या युध्दनौकेवरील तैनातींचा मार्ग मोकळा झाला आहे. असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: