सलग चौथ्या दिवशी सोन्यात तेजी, चांदीही वधारली

19

नवी दिल्ली, १० नोव्हेंबर २०२०: सोमवारी सोन्या-चांदीनं उसंडी घेतली. सलग चौथ्या दिवशी सोनं तेजीत बंद झालं. दिल्ली सोनं बाजारात सोन्याचा भाव २७७ रुपयांनी वाढून ५२,१८३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. परकीय बाजारात सोन्याच्या मजबुतीचा परिणाम देशांतर्गत दरावर झाला. चांदीचा भाव ६९४ रुपयांनी वाढून ६५,६९९ रुपये प्रति किलो झाला.

मागील व्यापार सत्रात सोन्याचे दर १० ग्रॅम ५१,९०६ रुपये होते, तर चांदी ६५,००५ रुपये प्रतिकिलो होती. विदेशी बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस १,९०६ डॉलर होती. चांदीची किंमत २५.७५ डॉलर प्रति औंस होते.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, “जो बिडेन यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अमेरिकेत सोन्यामध्ये तेजी झाली आहे. अमेरिकेत मदत पॅकेजेसची अपेक्षा वाढली आहे. कोरोनाच्या, वेगाने वाढणार्‍या प्रकरणांमुळं सोनंही वाढत आहे. खरेदी वाढली आहे. ”

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्हीपी नवनीत दमानी म्हणाले की, डॉलरच्या कमकुवतपणामुळं सोन्याचा आधार मिळाला. बिडेन यांची अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर तेथे मदत पॅकेजच्या आशा वाढल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे