इंदौर : २७ जूलै २०२२: इंदौरच्या महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थीनीसोबत रॅगिंग होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थींनीने युजीसीच्या हेल्पलाइनवर याबाबत तक्रार केली आहे.
युजीसीने या संपूर्ण प्रकरणाबाबत महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला माहिती दिली असून रॅगिंगविरोधी कमेटीने याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. अशी माहिती मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. संजय दीक्षित यांनी दिली.
वरिष्ठ विधार्थी आम्हाला सर्वांसमोर नाचायला लावतात. कधी खाण्याच्या वस्तु मागतात. तसेच नीट अभ्यास करु देत नाहीत. तसेच काही विधार्थी आम्हाला कॉलेज संपल्यावर त्यांच्या रुमवर बोलवतात. सोबतच अनैसगिंक शारिरिक संबंधही ठेवण्यासाठी आमच्यावर दबाव आणतात. असे या विद्यार्थीनीने मेलमध्ये म्हटले आहे.
आरोपीविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. योगितागंज पोलीस स्टेशनचे प्रभारी तहजीब काझी यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच त्यांचे जबाब नोंदवणेदेखील सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी:अमोल बारवकर