नवी दिल्ली, २० एप्रिल २०२३: पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो-झरदारी पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. ४ आणि ५ मे रोजी गोव्यात होणाऱ्या शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ते पाकिस्तानचे नेतृत्व करतील. SCO बैठकीत उपस्थित राहण्याबाबत बिलावल यांनी मौन बाळगले होते. मात्र आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा यांनी आपण भारतात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.
२०१४ मध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताला भेट दिली होती. त्यानंतर प्रथमच पाकिस्तान मधील नेता भारताला भेट देत आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताच्या युद्ध विमानांनी पाकिस्तानच्या बालाकोट मध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी प्रशिक्षण तळावर हल्ला केला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव कमालीचे ताणले गेले होते.
शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन मध्ये चीन, भारत, कझाकिस्थान, किर्गिस्थान, रशिया, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे. यंदा भारतात होणाऱ्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील. SCO सदस्य देशांच्या काही मंत्र्यांसोबत ते द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत. अशी माहिती केंद्रीय परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर