गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई मुंबईत परदेशी महिलेवर बलात्कार; ब्लॅकमेलिंग करून ७ वर्षांपासून ठेवले संबंध, आरोपीवर एफआयआर...

मुंबईत परदेशी महिलेवर बलात्कार; ब्लॅकमेलिंग करून ७ वर्षांपासून ठेवले संबंध, आरोपीवर एफआयआर दाखल

मुंबई, १२ मार्च २०२३ : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. मुंबईतील आंबोली परिसरात एका तरुणाने परदेशी महिलेवर बलात्कार केला. याबाबत महिलेने आंबोली पोललिस ठाण्यात तक्रार दिली असता आरोपीने घरातून पळ काढला. हा तरुण तब्बल सात वर्षांपासून पीडितेला ब्लॅकमेल करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता, असा आरोप आहे. सध्या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत.

मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पोलंडची रहिवासी आहे. मनीष गांधी असे महिलेवर बलात्कार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. आरोपी मनीष गांधी याच्याविरुद्ध मुंबईतील आंबोली पोलिस ठाण्यात आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासादरम्यान, आरोपीने २०१६ ते २०२२ या काळात पीडितेवर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडितेचे आक्षेपार्ह फोटो काढून आरोपी तिला ब्लॅकमेल करायचे. या कारणामुळे पीडितेला कोणालाच काही सांगता येत नव्हते. यापूर्वीही आरोपींनी फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला होता. याबाबत पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता आरोपी फरारी झाला. पोलिसांचे पथक आरोपी तरुणाचा शोध घेत असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version