सातपुड्यातील पायथ्याशी वनक्षेत्रात वन कर्मचाऱ्यांवर अस्वलांचा हल्ला, हल्ल्यात वनमजुराचा मृत्यू!

अकोट, १२ मार्च २०२४ : सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या अकोट तालुक्यातील शहापूर रुपागड जंगल परिसरात आज सकाळी सात वाजताच दरम्यान दुर्दैवी घटना घडली. सोमवारी सकाळी सात वाजताचच्या दरम्यान जितापूर वनखंड १०७७ मधील गस्त आटपून परत येणाऱ्या वनरक्षक सोगे व दोन वनमजुरांच्या पथकावर अचानक अस्वलांच्या कळपाने हल्ला केला. कळपात चार ते पाच अस्वल होते. यातील एका वयोवृद्ध वनमजुरावर त्यांनी हल्ला केला. नंतर अस्वलांनी शहापूर येथील ५० वर्षीय वनपाल रसूल रुस्तम मोरे यांच्यावरही हल्ला केला.

सोबत असलेले वनरक्षक व कर्मचाऱ्यांनी कसे-बसे मोरे यांना त्या अस्वलाच्या तावडीतून सोडवले. पण या अस्वलाच्या हल्यात मोरे हे गंभीर जखमी झाले असल्याने कॉस्टेबल सहकारी यांनी त्वरित त्यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु उपचारादरम्यान मोरे यांचा मृत्यू झाला. वनपाल रसूल मोरे यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंबीय हळहळले आहेत. या घटनेचा गंभीर दखल घेत वनविभागाने परिसरात अस्वलांवर बारीक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : शाहिद इकबाल

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा