गोल पोस्ट महाराष्ट्र फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्याला रांगेत उभे राहण्याची गरज नाही: जयंत पाटील

फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्याला रांगेत उभे राहण्याची गरज नाही: जयंत पाटील

मुंबई: हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘एग्रीकल्चर स्ट्राइक’ केले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा विधानसभेत केली आहे. तर कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना फॉर्म भरायची किंवा रांगेत उभे रहाण्याची गरज नसणार असल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी या घोषणेनंतर स्पष्ट केलं आहे.
या कर्जमाफीवर बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले की, आमच्या सरकारकडून शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात येत आहे.
मात्र या कर्जमाफीचे लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतेही फॉर्म भरायची किंवा रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे सरकार पैसे जमा करणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

error: Content is protected !!
Exit mobile version